फॅशनची दुनिया काही वेगळीच असते. कधी ती पारंपारिक साज देते तर कधी अगदी हटके आणि ट्रेण्डी स्टाईल देते आणि कधी दोन्हीचा संगम साधून समकालीन होते. पण या सगळ्यात सर्जनशीलता असते. काही फॅशन्स सतत वेगवेगळं काहीतरी समोर आणतात तर काही मुळत: न बदलता आधुनिक ट्वीस्ट देऊन समोर येतात. काळानुरूप सेलिब्रिटीजसह तरूण मुलंमुलीसुद्धा फॅशन बद्दल सजग राहू…
एका मुराकामीची गोष्ट
‘हारूकी मुराकामी’ हे नाव सध्या तरूण वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. हा मुळत: एक जपानी लेखक आहे. अर्थातच सगळी पुस्तकं आधी जपानी भाषेत लिहीलेली होती आणि काही काळानंतर ती इंग्रजीत सुद्धा प्रकाशित झाली.एक असाही काळ होता जेव्हा ‘चेतन भगत’ या नावाची लाट तरूणांमध्ये पसरली होती. विशेषत: महाविद्यालयीन मुलांच्या बॅगेत अगदी हमखास सापडणारी पुस्तके म्हणजे चेतन भगत या…
लपवलेल्या काचा
संगीत क्षेत्रातलं हरहुन्नरी नाव म्हणजे डाॅ. सलील कुलकर्णी. बडबडगीतांच्या आशयापासून ते अगदी शाॅर्टफिल्म्सच्या संगीतापर्यंत लीलया वावरणारा बहुरंगी कलाकार. कलाकाराचा साचा बनवलेला नसतो. जिथे संधी मिळेल तिथे तो कलाकृती उभारू शकतो. मग ते वेगवेगळ्या माध्यमातुन का असेना. आपल्या बालगीतांच्या ठेक्यावर त्या जागी फिरवून आणणारा संगीत अवलिया जेव्हा ललित लेखनामध्ये मन रमवतो तेव्हा त्याला सुद्धा एक विशिष्ठ…
थंडीतली खवय्येगिरी
थंडीचे गुलाबी वारे वाहू लागल्यावर अगदी वरच्या कपाटात बांधुन ठेवलेले विणलेले स्वेटर, हातमोजे, कानटोप्या बाहेर येतात. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्टी मधून बाहेर पडताच वेध लागतात ते थंडी स्पेशल खवय्येगिरीचे! कुठल्याही पंचतारांकित हाॅटेलवर किंवा खाऊ गाडीवर मिळणार नाहीत असे पारंपारिक चवीचे पदार्थ ही या खवय्येगिरीची खासियत असते. त्यामुळे अर्थातच ही पार्टी काही ३१ डिसेंबर सारखी…
काळाचा वेध घेणारा दंशकाल
गुढकथांचा विषय निर्विवादपणे वळतो तो रत्नाकर मतकरी आणि नारायण धारपांच्या लेखनाकडे. या लेखनाचं किंबहुना लेखकांचं वैशिष्ट्य म्हणजे, हे साहित्य वाचत असताना एक प्रकारचं वलय आपल्या सभोवताली निर्माण होतं आणि नकळत आपण त्या कथानकातलं पात्र होऊन जातो. ती गोष्ट आपलीच आहे किंवा आपल्याच भोवती घडत आहे असं जाणवून देणारा अदृश्य घटक आपल्याच कल्पनाशक्तीतून निर्माण होतो. माणसाचे…
नावात काय आहे
‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं. तसं बघायला गेलं तर हा शब्द बराचसा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहे. पण आजकालच्या डिजीटल काळात याचा वापर अनेकविध अंगाने वाढला आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रयोग…
दोन अंकी संशोधन
‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं.
स्टॅन्ड-अप का जलवा
आपल्या कलेला जितका भक्कम आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे तेवढीच समृद्ध आहे मराठी कलेची विनोदी शैली.
