परंपरेतून नावीन्य साधणारा धागा
श्रावण महिन्यातला सगळ्यात आवडता आणि हवाहवासा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे भावंडांच्या हक्काचा दिवस. बहिणीच्या हट्टाचा, भावाच्या प्रेमाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा आनंदाचा दिवस.
जेष्ठ कवी श्री मंगेश पाडगावकर यांनी अगदी यथोचित अर्थाने म्हटले आहे, ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे इथे भान हिरवे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अशाच काहीशा ऐटीत श्रावण मास येतो ; संपूर्ण सृष्टीला सौंदर्याचे आणि नवचैतन्याचे देणे देतो. श्रावणात…