सगळ्या सणांच्या तुलनेत दिवाळीत जो काही थाट माट असतो त्याला काहीच सीमाचं नसते. कपडे, दागिने, सजावट या सोबतच आवडीचा विषय असतो तो म्हणजे भेट-वस्तू! दिवाळी हक्काचं निमित्त असतं जेव्हा भरगोस भेट-वस्तूंची देवाण-घेवाण करता येते. पाडवा, भाऊ-बीज, लक्ष्मी पूजन या दिवसांमध्ये मित्र-मंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक भेटतात त्या निमित्ताने प्रत्येकासाठी काहीतरी छान गिफ्ट घेतलं जातं. आजकाल इतक्या नवं-नवीन वस्तू, बाजारात आल्या आहेत, शो-पीस, कपडे, फोटो-फ्रेम, क्रोकरी, तुम्हाला जे हवं त्यात असंख्य विविधता मिळते.आजकाल कॉपोरेट गिफ्टिंग हा प्रकार प्रचंड प्रचलितआहे. पूर्वीच्या काळी सरकारी नोकरी, किंवा बँकांच्या नोकरीचं प्रमाण जास्त असायचा, तेव्हा पगाराला पगार, बोनस, फराळ अशाच भेट-वस्तू लोकांना मिळायच्या. आता काळ बदलला, कामाचे स्वरूप, नोकऱ्या, ऑफिस सगळंच हळू हळू आधुनिक होत गेलं. त्याच बरोबर मिळणारे, पगार, लोकांच राहणीमान, आवडी, हौसहे सगळंच मोठं झाल. सणवार साजरे करायच्या पद्धती सुद्धा आधुनिक आणि परंपरेची समीकरणं घालू लागल्या. या पार्श्वभूमीवर भेटवस्तू किंवा कॉर्पोरेट गिफ्टिंगचे काय ट्रेंड्स सध्या चालू आहेत त्याचा आढावा घेऊया. खासकरून कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये गिफ्टहॅम्पर्स हा प्रकार बघायला मिळतो. याचं साधं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात अर्थतच होलसेल मध्ये वस्तू घेतल्या की बाजरी किमतीच्या निम्म्या किंवा थोड्या कमी किमतीत खरेदी करता येतात तसेच त्या किमतीत वेग-वेगळ्या प्रकारच्या वस्तू देता येतात. उदाहरणार्थ आता ड्रायफ्रूट हॅम्पर देयची पद्धत आहे त्याच्यात १००० रुपयात अगदी २५-५०ग्रॅम चे ४ प्रकार तरी देता येतात.
- पर्सनलाईज गिफ्ट्सचा ट्रेंड
दुकानांमधून भेटवस्तू खरेदी करण्यापेक्षा आपल्याला आवडतील त्या पद्धतीने कस्टमाइज्ड करून घेण्याकडे या पिढीचा कल वाढला आहे. अशा पद्धतीच्या गिफ्ट हमापर्स मध्ये, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या किंवा दिवे, वॉल-पीस, फोटोफ्रेम्स, मग्स, लोकरीचे, खाणाचे तोरण, रांगोळ्या असे सुंदर प्रकार असतात. ते दिसायलाही छान दिसतात आणि सण सोडून एरवी सुद्धा तुम्ही वापरू शकता. कॉर्पोरेट गिफ्ट मध्ये कंपनीचा लोगो असलेला मग्, बॉटल, फोटोफ्रेम, डायरी हे सुद्धा फार आवडीचे प्रकार आहेत. या वस्तू तुम्ही वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून सुद्धा घेऊशकता किंवा एकाच विक्रेत्याकडून हॅम्पर्स बनवून सुद्धा घेऊ शकता. पर्सनलाइज्ड किंवा कस्टमाइज्ड गिफ्टिंग मध्ये सध्या अजून एक ट्रेंडिंग प्रकार म्हणजे कुशन्स किंवा छोट्या उशा ज्या सोफ्यावर सजावट म्हणून ठेवता येऊ शकतात. उशा तुम्ही कुठल्याही शॉपिंग साईटवर किंवा दुकानात घेऊ शकता, त्याच्या कव्हर्सची इतकी अगणित व्हरायटी तुम्हाला मिळेल की निवडताना थकून जाल. कव्हर्स तुम्ही कस्टमाइझ करून घेऊ शकता. कॉर्पोरेट गिफ्ट करायचे असेल तर कंपनीचा लोगो, ग्रुप फोटो असाही करू शकता. त्याखेरीज पैठणीच्या कव्हर्सचा सध्या खूप ट्रेंड आहे. तुम्हला हव्या त्या फॅब्रिक आणि डिझाईनचे कव्हर तुम्हला मिलू शकतात. - सुगंधी गिफ्ट्स
दिवाळी साठी खास काही कंपन्या, ऑफिसेस, बँका ऑरगॅनिक धूप, अगरबत्त्या, सातत्याने गिफ्ट देत असतात. आता हा प्रकार जर तुम्हाला बोरिंग किंवा जुना पूर्ण वाटत असेल तर मंगलदीप सारख्या ब्रॅंड्सचे गिफ्ट बॉक्स तुम्हीजरूर पहा. आधुनिक धुप स्टिकस, धूप कप , अगदी फ्रेश सुगंधांच्या अगरबत्त्या, सांबरानी धूप, टी-लाईट कॅण्डल्स अशा खास दिवाळीसाठी आकर्षक वस्तूंसह त्यांनी गिफ्ट हॅम्पर्स लाँच केले आहेत. हे तुम्ही घरातील मंडळींनाही भेट म्हणून देऊ शकता. दिवाळी साठी खास लाँच केलेल्या हॅम्पर्स मध्ये छोटी भागवत गीता, शुभ-लाभ स्टिकर, तोरण अशाही वस्तू त्यांनी घातल्या आहेत. हर गिफ्ट बॉक्स अगदी ४००, ५०० रुपयांपासून चालू होतात तसेच धूप स्टिक्स, अगरबत्त्या, असे आयटम १००-१५० रुपयातही मिळू शकतात. मेट्रो-शहरांमध्ये सगळ्या शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणजे झेपटो , ब्लिंकिट, ऍमेझॉन अशा साईट्स वर उपलब्ध आहेत. - ऑल टाइम हिट चॉकलेट्स
चॉकलेट हॅम्पर्स जरी नवीन ट्रेंड नसला तरी ते कधी कालबाह्य होतील असं वाटत नाही. रक्षाबंधन ला कॅडबरी कंपनीने जी प्रथा पाडली ती आता प्रत्येक सणाला लोकप्रिय झाली आणि त्यात बरीच विविधता आणि नावीन्य आलं. यातही आता हॅन्ड-मेड चॉकलेट्सची जास्त चालती आहे.
आकर्षक आकारातले, पॅकिंग मधले चॉकलेट्स कॉर्पोरेट गिफ्टींगच्या हॅम्पर मधला भाग असतातच. फक्त चॉकलेट्स नाही तर कूकीज सुद्धा गिफ्ट हॅम्पर मधला मस्टहॅव आयटम झाला आहे. चॉकलेट कूकीज, बटर कूकीज, ड्रायफ्रूट कूकीज, थोडं हेल्दी हवं असेल तर ओट्स कूकीज, असे भरपूर प्रकार तुम्हाला बाजरात किंवा घरगुती पद्धतीने बनवून मिळतील. दिवाळी पार्टी करणार असाल तर चॉकलेट आणि कूकीज शिवाय पार्टी फिकी वाटेल. जितका आता फराळ महत्त्वाचा झाला आहे तेवढेच चॉकलेट आणि कूकीज सुद्धा.
किंडर जॉय हे फेरेरो रोशन कंपनीने बनवलेले अतिशय लोकप्रिय लहानमुलांचे चॉकलेट आपल्याला माहीतच आहे. इतर चॉकलेटच्या गिफ्ट हॅम्पर पेक्षा वेगळा काही हवं असेल तर किंडर जॉयचा गिफ्ट बॉक्स हा उत्तम पर्याय आहे.चॉकलेट खायला काही वयाचे बंधन नाही त्यामुळे हा गिफ्ट बॉक्स कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये असेल तर कर्मचारी नक्कीच खुश होतील तसेच कौटुंबिक गेटटुगेदरसाठी तर हा अगदी परफेक्ट चॉईस आहे. गिफ्ट बॉक्स सोबत लहानमुलांसाठी एक सरप्राईज आयटम सुद्धा त्यांनी दिलेला आहे. चॉकलेट्स सोबत कॅकेचे वेगवेगळे प्रकार सुद्धा सणावाराला खायला लोकांना आवडतात. कॅप-केक, डोनट्स आणि टी-टाइम केक याचा सुद्धा तुम्ही चॉकलेटचे हॅम्पर देताना विचार करू शकता. - परफ्यूम्स
लोकांचं राहणीमान आणि पद्धती आधुनिक झाल्या तेव्हापासून परफ्युम हा प्रकार लोकप्रिय झाला. पूर्वी जरा उच्चवर्गातली, श्रीमंत, बिझनेसमॅन, नटनट्या वगैरे लोकच परफ्युम वापरतात असे एक धोरण होते परंतु आता तसे काहीच उरले नाही. आजच्या काळाची,गरज आणि फॅशन म्हणून परफ्युम सर्रास वापरले जाते. गिफ्ट देण्यासाठी म्हणूनअगदी एलिगंट, फॅन्सी, आणि तरीही बजेट मधला हा पर्याय अगदी योग्य आहे. बेलाविटा, मेन्स कंपनी, एंगेज सारखे ब्रॅण्ड्स ट्रेंडिंग आहेत कारण ते अगदी बजेट मध्ये फ्रेश परफ्युम देतात. त्यांच्या बाटल्याही अगदी रेखीव आणि सुंदर असतात. याचे असंख्य कॉम्बोपॅक तुम्हाला हव्या त्या साईट वर उपलब्ध आहेत. तसेच थोडा वेगळा पर्याय म्हणून इझे ब्रॅण्डचा विचार करू शकता. याचे बरेच परफ्युम युनिसेक्स प्रकारात असतात तसेच महत्त्वाचे म्हणजेहा ब्रँड भारतीय असून हे होममेड परफ्यूम्स असतात. यांचे डियो सुद्धा त्यांचा साईट वर उपलब्ध आहेत. त्यांचे पॅकिंग आणि बॉटल अतिशय युनिक आणि आकर्षक आहेत. परफ्युम्सचे सुगंध जास्त उग्र नाहीत ज्याने त्रास होईल.यांचे अनेक गिफ्ट बॉक्स सवलतीच्या ऑफर्ससह अधिकृत साईट वर तसेच शॉपिंग साईट्सवर सुद्धा उपलब्ध आहेत.
- आवडीचा सुकामेवा
हा सगळ्यात आवडीचा आणि चालणारा कॉर्पोरेट गिफ्ट आयटम आहे. पूर्वीपासूनच सुंदर डेकोरेटिव्ह बॉक्स मध्ये ४-५ प्रकारचे ड्रायफ्रूट मिळतात. ते दिसायला छान, शाही दिसतात, गिफ्ट द्यायला सोपे आणि होलसेल प्रमाणात घ्यायचे असले कि स्वस्त पडतात. अर्थात ते प्रत्येक घरात वेगवेगळ्या निमित्ताने वापरलेही जातात. काजू, बदाम, पिस्ता, मनुका हे ४ प्रकार जास्त करून दिले जातात. आता याचेही आणखीन आकर्षक कॉम्बो पॅक, या बरोबर मोती साबण, पणत्या, आकाश कंदील, एखाद दुसरं गोड असा गिफ्ट बॉक्स सुद्धा दिला जातो. हा एकमेव पदार्थ आहे जो पिढ्यान-पिढ्या दिवाळीला कॉर्पोरेट भेट म्ह्णून दिला जातो. - स्पा आणि कॉस्मेटिक आयटम
तुमचं ऑफिस ज्या प्रकारचं आहे किंवा कर्मचारी जसे आहेत त्या प्रकारे तुम्ही गिफ्ट बॉक्स प्लॅन करू शकता. काही ऑफिसेस मध्ये फक्त महिला किंवा तरुण मुली कर्मचारी असतात, मोठंमोठ्या कॉस्मेटिक कंपन्या स्वतःचेच प्रोडक्टस गिफ्ट बॉक्स मध्ये देतात. आता दिवाळी गिफ्ट बॉक्सची सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहावी, कर्मचाऱ्यांना योग्यते बक्षीस वेळोवेळी देत राहावं अशा उद्देशाने काही ठळक कॉस्मेटिकस गिफ्ट बॉक्स ऑफिसेस मध्ये दिला जातो. आता जिथे पुरुष व महिला दोन्ही कर्मचारी आहेत त्यांचे कधी कधी वेगवगेल तर कधी युनिसेक्स प्रोडक्ट असलेले गिफ्ट बॉक्स दिले जातात. या पद्धतीच्या गिफ्ट बॉक्स मध्ये लोशन्स, क्रीम्स, सुगंधी साबण, सुगंधी किंवा आरोग्यदायी तेल, परफ्यूम्स, मेक-अप सेट्स हे प्रोडक्टस असतात. नायका , मेबलींन, लॅक्मे, किंवा आता बरवा, शुगर, मॅक अशा मोठ्या ब्रॅंड्सचे अनेक ऑफर्ससह ट्रेंडिंग प्रोडक्टस उपलब्ध आहेत. - सिरॅमिक
हॅन्डमेड, पर्यावरण पूरक, इंडियन ओरिजिन अशा पद्धतीने बनलेल्या वस्तूंना खूप महत्त्व आहे. त्यातलाच एक नवीन आलेला आणि अतिशय रुजलेला ट्रेंड म्हणजे सिरॅमिक पासून बनवलेल्या गोष्टी विशेषतः क्रोकरी किंवा शो-पीस. याच्या मध्ये इतके सुरेख आणि नाजूक डिझाईन असतात कि कुठला घेऊ कि कुठला नको असं होतं. बाउल्स, मग सेट, प्लेट्स, क्रोकरी सेट असंख्य गोष्टी तुम्हाला हव्या त्या डिझाईन मध्ये मिळू शकतात. डायनिंग टेबलवर ठेवायला छानशा बरण्या, विविध आकारातले बाउल्स, सर्विंग प्लेट्स गिफ्ट द्यायला फारच सुंदर दिसतात. कधी कधी एकच आयटम हवा असतो पण अगदी नीटनेटका आणि सुंदर हवा असतो अशा वेळी हा पर्याय उत्तम आहे. क्ले किंवा मातीपासून बनवल्यामुळे याची किंमत काचेच्या वस्तूंसारखी महागडी नसते. हे तुम्हाला ऍमेझॉन पासून ते अगदी बिग-बास्केट, ब्लिंकिंट पर्यंत सगळीकडे मिळेल. याचाही होम-बिझिनेस काही छोटेखानी व्यापारी करतात. वॉलपीस, शोपीस, इनडोअर झाडं असे प्रकार सुद्धा सिरॅमिक पासून बनवलेले मिळतात जे तुमच्या घराला छान शोभा देतात. आजकाल इंटेरिअर करताना तरुण पिढी खास करून सिरॅमिकच्या शो-पीसचा वापर करताना दिसते. - टेकनॉलॉजि गिफ्ट्स
तुमचं बजेट थोडंसं जास्त असेल किंवा तुमची कंपनी हे प्रोडक्टस बनवत असेल तर पॉवर बँक, फॅन्सी इअरफोन्स, स्पिकर्स, यूएसबी, स्मार्ट वॉच अशा गिफ्ट्स बद्दल पण तुम्ही विचार करू शकता. टेकनॉलॉजि गिफ्ट्स देत असाल तर असे गिफ्ट्स द्या जे कोणालाही वापरता येतील. गिफ्ट हॅम्पर देणार असाल तर यातला एक एक आयटम तुम्ही देऊ शकता. कर्मचाऱ्यांना नक्कीच आवडेल तसेच यावर कस्टमाइज्ड करून घेण्यासाठी कंपनीचा लोगो सुद्धा प्रिंट करून घेऊ शकता. भाऊ-बीज आणि पाडव्याला सुद्धा हे गिफ्ट अगदी योग्य आहे. या व्यतिरिक्त ज्वेलरी, पर्सनलाइज्ड स्टेशनरी, वॉल-क्लॉक, कि होल्डर नवीन वर्षाचे कंपनीचे कॅलेंडर असे अनेक प्रकार कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये प्रचलित आहेत. किंबहुना ते असेही दिलेच जातात त्या सोबत दिवाळीसाठी खास काय द्यायचे असा अनेकांना प्रश्न पडतो तेव्हा अशा काही गोष्टींचा विचार नक्कीच करू शकता. तोरणांमध्येही आता लोकरीच्या तोरणांची चालती दिसेल कारण ते दिसायला फारच सुंदर दिसतात आणि वॉशेबल असतात. सध्या व्होकल फॉर लोकल हे धोरण असल्याने असे एकही प्रोडक्ट नाही जे कुणी घरगुती पद्धतीने देत नसेल. अशा व्यापाऱ्यांकडूनघेतलेत तर लोकांनाही चार पैसे मिळतात आणि तुम्हाला होलसेल दारात घेतलेत तर स्वस्त मिळतात. सणाचं गिफ्ट म्हटलं तरी कंपनीची आर्थिक गणित त्यात दडलेली असतातकाही हौशी कंपन्या कार, लॅपटॉप, आयफोन, अँड्रॉइड फोन, मॅकबुक असा श्रीमंती थाट सुद्धा दाखवतात. परंतु कॉर्पोरेट गिफ्टिंग एकूण ट्रेंडलाच अनेक नवीन वळणं मिळाली आहेत, आयटी क्षेत्र जेव्हापासून भारतात वाढतगेलं तेव्हापासून कंपन्यांचा राजेशाही थाट होत गेला. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून, त्यांना कंपनी बद्दल प्रेम वाटाव म्ह्णून तसेच कंपनीचा दर्जाही वाढावा अशा अनेक कारणांमुळे कॉर्पोरेट गिफ्टिंगचे विचार, कल्पनामोठ्या मोठ्या होत गेल्या.
येणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!