तरूणांचा पेशवाई थाट

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणिय क्षण असतो किंबहुना प्रत्येकाला तो तेवढा खास बनवायचा असतो. हल्लीच्या लग्न समारंभात पेशवाई थिम पुन्हा एकदा लोकप्रिय होताना दिसतेय. अंगरखा, पगडी, शिरपेच, मोती पोळ्याच्या माळा, नववारी, दागिन्यांचा साज आणि बरंच काही… या सगळ्या थाटमाटात तरूणांची लगीनघाई सध्या दिसून येत आहे. यात दागिन्यांचा आणि कपड्यांचा लूक लग्नात अगदी शोभून आणि साजेसा दिसतो, असे तरूणांचे मत आहे. यंदाच्या…

केक आणि बरचं काही

काही वर्षांपुर्वी एखाद्या वाढदिवसाचे बोलवणे आले की एकचं अप्रुप असायचे ते म्हणजे केकचे. त्यावेळी व्हॅनिला आणि चाॅकलेटचे काॅंबिनेशन असलेला, रेड चेरीने सजविलेला केक हेच आकर्षण होते. तसा केक घरात आला म्हणजे काहीतरी खास आहे असे वाटायचे. ब्लॅक फोरेस्ट, पाईनॲपल, डार्क चाॅकलेट या सोबतच फोटो केकचा ट्रेंण्डसुद्धा अगदी आता आतापर्यंत लोकप्रिय होता.    पण आताचा ट्रेंण्ड हा…

चार चाकांचे वेड

प्रत्येकालाच कुठल्याना कुठल्या गोष्टीचं वेड असतं. पण त्या वेडाचे ध्यासात रूपांतर झाले तर तोच खरा कलाकार ठरतो. जो आपल्या क्षेत्रात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना जो स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ते सत्यात उतरवण्याचे धाडस करतो तो प्रत्येकजण कलाकारच असतो.    ही गोष्ट आहे अशाच एका १९ वर्षाच्या कार वेड्याची. मुलगा म्हटलं की कार…

वसुधैव कुटुम्बकम्

आजचा दिवस हा ‘जागतिक कुटुंब दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय परंपरेत कुटुंबसंस्थेला खूप महत्त्व आहे. मुळात भारतीय संस्कृतीच ही कुटुंबवत्सल संस्कृती आहे. जगभरात पाश्चात्यकरणाचे वारे वाहू लागले आणि विभक्त कुटुंब पद्धत उदयाला आली. या पार्श्वभूमीवर भारतात आजही एकत्र कुटुंब पद्धत बहुतांश परिवारात पाहायला मिळते. अजून नाविन्यपूर्ण कुटुंबाची कल्पना म्हणजे ‘विस्तारित कुटुंब’ किंवा ‘एक्सटेंडेड…

काचा पाणी

या नावाचा खेळ आपल्या आई-आजीच्या काळात खूप लोकप्रिय होता. हातांच्या ओंजळीतून काचांचे तुकडे जमिनीवर पसरायचे आणि त्यातल्या सुटे सुटे तुकडे इतर काचांना न हात लावता वेचायचे. अगदी सोपा आणि सहज! पण पूर्वीच्या काळाची हीच तर खासियत होती. छोट्या छोट्या गोष्टीतून आयुष्य जगण्याची कला अवगत होईल असे संस्कार आपल्या लहानपणापासून होत गेले. त्या तुटलेल्या वेगळ्या काचा…

ब्रिडा

पाउलो कोएलो हे नाव ‘अलकेमिस्ट’ या पुस्तकामुळे तरूणांमध्ये लोकप्रिय झाले. मुळत: ब्राझिलियन असलेला हा लेखक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कथानकाने तरूण वाचकांना आकर्षित करतो. या लेखकाचे कथानक सातत्याने  अद्भुत शक्ती, अंतर्मन, अशा विविध वलयांकित विषयांवर असते. त्याचा मूळ गाभा कोणा एका व्यक्तीवर असतो आणि त्याला पावलोपावली वेगवेगळ्या रूपात भेटणारा, सज्ञान करणारा गुरू असतो. हेच या लेखकाच्या लेखनशैलीचे वैशिष्ठ्य…