श्रावण महिन्यातला सगळ्यात आवडता आणि हवाहवासा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे भावंडांच्या हक्काचा दिवस. बहिणीच्या हट्टाचा, भावाच्या प्रेमाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा आनंदाचा दिवस. घर मुला-बाळांनी गजबजलेलं असतं. भेट-वस्तू, ओवाळणी, नवीन कपडे, समारंभ, अशा सगळ्याची मांदियाळी असते.
या निमित्ताने आजची पिढी जी आपापल्या आयुष्यात अत्यंत व्यस्त, व्यग्र आणि धावती आहे ती एकत्र जमते, मजा-मस्ती करते, जुने बालपणीचे दिवस नव्याने जगते. कोणत्याही वयातली भावंडं असली तरी या सणाला आनंद साजरा करायला कोणतीही परिसीमा नसते. तपं विशेषतः तरुण पिढीचा उत्साह कुठलाही समारंभाला नाविन्याची झालर लावत असतो. समारंभ साजरे करण्याची पद्धत असेल, कपड्यांची फॅशन असेल, किंवा अगदी राखी पौर्णिमेची स्पेशल राखी असेल… सगळ्यातच त्यांचा एक ट्रेंडिंग टच असतो. असेच राख्यांमध्ये गेल्या काही वर्षात फारच इंटरेस्टिंग ट्रेंड्स आले आहेत.
पूर्वीचा काळी राख्यांना धार्मिक आणि भावनिक महत्त्व असला तरी साध्या धाग्यांपासून ते बनवले जायचे. रेशीम, कापूस, सुटली अशा अगदीच नैसर्गिक आणि साध्या गोष्टींपासून बनलेल्या राख्या असायच्या. नवीन काळातील राख्यांनी अनोखा ट्रेंड आणला असला, तरी या पारंपरिक राख्यांची जादू तरुणाईच्या मनावर गरुड करून आहेच.
प्रीमियम राखी:
रोजच्या राख्यांसोबतचं आता मोती, पन्ना, हिरे, इतर मौल्यवान खडे, कुंदन, चांदी आणि सोने अशा पद्धतीची सामग्री वापरून सुद्धा शाही राख्या बनवल्या जातात. सोनारांकडे अशा राख्या खास बनवून सुद्धा घेतल्या जातात. राखीच्या साध्या धाग्याच्या जागी सोन्या-चांदीच्या साखळ्या असतात आणि सजावटीसाठी मोती किंवा खडे वापरल्या जातात. शिवाय, या राख्या इतर वेळी ब्रेसलेट म्हणून सुद्धा वापरल्या शोभतात. अशा प्रकारे, तुमचा भाऊ वर्षभर घालू शकेल अशी राखी तुम्ही शोधत असाल तर ही एक असू शकते. मौल्यवान आणि प्रीमियम राखीची ही निवड तुमच्या सोहळ्याला शाही टच देईल.
रेझीन राखी:
सामान्यतः रेझीन या प्रकाराला राळ म्हणतात. या रेझिनची राखी बनवण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असते. रेझिनचे एक मिश्रण तयार केले जाते सिलिकॉन मोल्ड्स मध्ये ठेऊन आकार दिला जातो ज्याने ते घट्ट एक जीव राहते. ते मिश्रण ओले असताना तुम्ही त्याच्यात हवी ती सजावट करू शकता. या राख्यांमध्ये फुलांच्या फुलांच्या पाकळ्या , चमकी, मोती, छोटे छोटे खडे किंवा मणी असे कस्टमाइज्ड डिझाईन तुम्ही बनवू शकता. रेझिनचा टिकाऊपणा आणि चकचकीत फिनिशमुळे या राख्या भरपूर काळ टिकतात तसेच आजकालच्या सस्टेनेबल आणि पर्यावरणपूरक फॅशनमध्ये हा प्रकार अगदी परफेक्ट बसतो. सध्या या राख्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत.
भैय्या-भाभी राखी:
रक्षाबंधन हा परंपरेने बहीण-भावाचा सण आहे. परंतु राजस्थानमध्ये आणि आजूबाजूच्या भागांमध्ये भाभी म्हणजेच भावाच्या बायको सोबतही राखी पौर्णिमा साजरी करण्याची एक नवीन परंपरा आहे. हे आता बहुतेक भागांमध्ये किंवा शहरांमध्ये त्या प्रचलित झाले आहे. आता भैय्या आणि भाभी दोघेही राखी बांधून घेतात आणि त्या दोघांसोबत भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. भाभीला सुद्धा ज्यामुळे त्यांच्या भाभीचे कुटुंबात स्वागत देखील होते. या नवीन परंपरेने अनेक नवीन आठवणींचा आणि ऋणानुबंध जोडले जातात. याच पद्धतीमध्ये भैय्या-भाभी राखी लोकप्रिय झाल्या आहेत. या राख्या कस्टमाइज्ड पद्धतीने बनवून घेण्याचा ट्रेंड आहे. तुम्हाला हवी तशी प्रीमियम रत्नजडित राखी किंवा अगदी नाव गोंदवून सुद्धा या राख्या मिळू शकतात. भैय्या-भाभी राखी साठी भावाला ब्रेसलेट राखी आणि भाभीला जी राखी बांधली जाते त्याला लुम्बा राखी असे म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर आपण ड्रेस किंवा ब्लाऊजला जसे लटकन लावतो तशी पद्धतीची ही राखी असते. ऑनलाईन शॉपिंग मध्ये या राखियांचे सुंदर सुंदर गिफ्ट हॅम्पर्स सुद्धा मिळतात ज्यामध्ये चोकोलेट्स, ड्रायफ्रुटस असे गिफ्ट पॅक असतात.
क्रोशे (लोकर) राखी:
पूर्वीचा बायका विशेषतः आपल्या आजीच्या हातात आपण सतत लोकर विणताना पाहिलेला असता. पण मागच्या एखाद दोन वर्षात हा प्रकार पुन्हा एकदा तरुणाई फॅशन ट्रेंड मध्ये दिसतो आहे. लोकरीच्या इतर सजावटीच्या गोष्टींसह राख्या सुद्धा संध्या ट्रेंड मध्ये आहे. लोकरीची हाताळायला, सांभाळायला आणि वापरायला सगळ्यात सोपी आहे. राखी म्हणून सुद्धा वेगळा काहीतरी प्रकार दिसायला छान दिसतो. मुळात लोकरीमध्ये वेगवेगळे रंग असतात जे विणल्यावर अगदी सुरेख आणि सुबक दिसतात. क्रोशेचे दागिने जसे आता ट्रेंडिंग आहेत तसेच क्रोशेची राखी ब्रेसलेट सारखी हातात छान दिसते. शिवाय कुठल्याही वयातल्या भावाला त्याच्या आवडी प्रमाणे ही राखी देता येते. यात सुद्धा वेगवेगळे मणी ओवून घातले कि राखीला अगदी शोभा येते. हॅन्ड-मेड राख्यांमध्ये तुम्हाला चांगला प्रकार हवा असेल तर लोकरीची राखी हा प्रकार खरंच वेगळा आहे.
या पेक्षा अनेक अजून वेगवेगळ्या राख्या बाजारात पाहायला मिळतील, त्या सगळ्यात इथे नमूद करायचं म्हटलं तर अनेक पानं सुद्धा अपुरी पडतील कारण तरुणाईच्या नावीन्यतेला, कलाकुसरीला कसलीच मर्यादा नाही. प्रत्येक वर्षी आधीच वर्षी पेक्षा अनेक वेगळे प्रकार पाहायला मिळतील. सध्या हे प्रकार तरुणाईचा समारंभात ट्रेंडिंग आहेत. हल्ली सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तरुणाईला प्रत्येक गोष्टीतही वेगळेपण हवं असता आणि महत्त्वाचं म्हणजे ते वेगळेपण त्यांना शोधता सुद्धा येतं. या माध्यमांमुळेच जग छोटा झालंय; याचा फायदा असा कि सामाजिक बांधिलकी, पर्यावरणपूरकता, समयसूचकता या सगळ्याच गोष्टींचं भान तरुणाईला फार चांगल्या प्रकारे उमगलंय. तसेच राहणीमान बदलल्यामुळे किंबहुना ते अधिक चांगला आणि ऐषोआरामात झाल्यामुळे त्यांना प्रत्येकच गोष्टीचे सोहळे करता येतात. राखी पौर्णिमा तर सोहळा करण्याचा सगळ्यात मोठा दिवस आहे.
राखी बांधून घेणारा हात नेहमीच रक्ताच्या नात्यातला असतोच असं नाही. कधी कधी जवळचा मित्र, बहिणीचा नवरा, किंवा एखाद्या बहिणी मध्ये सुद्धा भाऊ सापडतो असे प्रौढ तरूणाईचे मत आहे. राखी ही संरक्षण करण्याच्या विश्वासावर बांधली जाते, ह्या भावनेला एकाच नात्यात अडकवून का ठेवायचे असे तरूणाईचे विचार आहेत.
आजच्या तरूणाईला सण समारंभ, कल्पकता, तंत्रज्ञान ह्या सगळ्याची जितकी आवड आहे तितकचं ते समाज भान ही बाळगून असतात. अनाथाश्रम, दिव्यांग किंवा विशेष मुलांसाठी कार्यरत संस्था, महिला बचत गट व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणार्या संस्थांशी बरेच तरूण जोडले गेले आहेत. तरूणाई समाजातला महत्त्वाचा व समृद्ध करणारा घटक म्हणतात ते ह्याचसाठी. समाजात जे काही जीवनावश्यक कमी जास्त बदल होत असतात ते तरूणाई भोवतीच फिरत असतात. तरूणाईच्या पद्धतीने हे बदल रूजत असतात. ह्यातून हे नक्कीच सिद्ध होते की तरूणाईची सण समारंभ साजरे करण्याची परिभाषा बदलली असेल पण त्यांची ईच्छा आणि हौस मात्र आधीच्या पिढीपेक्षाही एक पाऊल पुढे नक्कीच आहे. रूढी परंपरा सांभाळून व त्याची हौस साधून समारंभांचा उत्कृष्ट मेळ त्यांना घालता येतो हे नक्की.